₹२०० व ₹५०० च्या बनावट नोटा चलनात; युवा व्यावसायिकाला ₹१,२०० चा गंडा, नोटा तपासून स्वीकारण्याचे आवाहन.
दोडामार्ग, दि. ३ जुलै
दोडामार्ग बाजारपेठ मध्ये दोनशे पाचशे रुपये बनावट नोटा चलनात आणून लहान छोटया व्यवसायिक याना गंडा घालण
सुरू झाले आहे. अशा प्रकारे दोडामार्ग बाजारपेठ मधिल एका युवा व्यवसायिक याला बनावट नोटा देऊन १२०० रूपयाचा गंडा घातला आहे. तेव्हा व्यापारी वर्ग यांनी सावध राहून नोटा तपासून घ्यावे असे आवाहन फटका बसलेल्या युवा व्यवसायिक याने केले आहे.
दोडामार्ग बाजारपेठेत एका युवा व्यावसायिकास तब्बल १२०० रु चा फटका बसला आहे. बनावट नोटा मिळाल्याने हा तोटा झाला. अन्य कोणाला नुकसान होऊ नये म्हणून सतर्कता म्हणून त्यांनी ही माहिती माध्यमाना दिली आहे. दोडामार्ग व्यापारी संघटना यांनी याबाबत व्यापारी वर्गात बनावट नोटा बाबत जनजागृती करून अशा प्रकारे कोण नोटा देताना तपासणी करून घ्यावे जेणेकरून फसगत होवू नये असे आवाहन या युवा व्यवसायिक याने जनजागृती म्हणून केले आहे.