दोडामार्ग,दि.२९ जून
साटेली भेडशी वरचीवाडी येथे घरात कुणी नाही ही संधी साधून काही अज्ञात चोरट्यांनी आशेशाव सालू रोड्रिक्स यांच्या घरात दरवाजा कुलुप तोडून प्रवेश करत रोख रक्कम तसेच दागिने असा तीन लाखांची चोरी केली आहे यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान घटना स्थळी आलेल्या श्वान पथकाच्या माध्यमातून काही जणांना संशयित म्हणून उशिरा ताब्यात घेतले आहे. दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. आशेसाव राॅड्रिक्स याने फिर्याद दिली आहे.
दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री उशिरा आशेसाव राॅड्रिक्स यांच्या घरात कुणी नाही ही संधी साधून दोन ठिकाणी वरचीवाडी येथे घरफोडी केली. अज्ञात चोरटयानी घराचे कुलुप तोडून आत प्रवेश करुन काळया मण्याचे पिडूक असलेले मंगळसूत्र, हातातील बसलेट, सोन्याची माळ, दोन कानातील जोड, ५५ हजार रोख रक्कम, असा एकूण ३ लाख सात हजार रुपये मुद्देमाल चोरून नेला आहे यामुळे खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती दोडामार्ग पोलीस ठाण्यात समजताच तातडीने हालचाली करून तपास करत ठसे तंज्ञ, श्वान पथक घटनास्थळी बोलवण्यात आले.
पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक निरीक्षक आशिष भगत, पोलीस नाईक, यानी पंचनामा केला.
दरम्यान सोमवारी सायंकाळी उशिरा दाखल झालेल्या श्वान पथकाच्या माध्यमातून काही जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.