गोवा वन विभाग आणि अग्निशमन दलाने मध्यरात्री विशेष बचाव मोहीम राबवून सर्वांना सुरक्षित बाहेर काढले.
दोडामार्ग, दि. २९ जून
विर्डी सखल धबधबा या ठिकाणी नुकताच धारवाड हुबळी येथील विजय दोडमणी या युवकाचा बुडून मृत्यू झाला ही घटना ताजी असताना देखील काही युवक पुन्हा याच ठिकाणी वर्षा पर्यटन करण्यासाठी येतात. अशा प्रकारे साखळी गोवा येथील सहा युवक या विर्डी सखल धबधबा ठिकाणी गेले. यावेळी नदी पाञात पाणी नव्हते पलीकडे गेले. पण कर्नाटक चोर्ला जंगल भागात पाऊस पडला आणि पाणी पातळी वाढली यामुळे अंधार पडायला हे सहा युवक अडकून पडले. नेटवर्क साधन नसल्याने राञी उशिरा पर्यंत ते अडकून पडले. ही माहिती गोवा वन विभाग तसेच अग्निशमन दल जवान याना समजताच मध्यरात्री सच आॅपरेशन करून या सहा साखळी गोवा येथील युवकांना सुखरूप पणे बाहेर काढले.
साखळी गोवा येथील सहा युवक विर्डी सखल धबधबा वाॅटर फाॅल येथे रविवारी गेले होते. जाताना नदी मध्ये पाणी नसल्याने सहज चालत गेले. पण काही तासांनी माघारी फिरले तेव्हा नदीच्या प्रवाहात वाढ झाली काही जणांनी नदी मधून येण्याचा प्रयत्न केला पण प्रवाह वेग पाहून जीव धोक्यात न घालता त्यांनी नदी पलीकडे थांबले.
साखळी येथे संपर्क साधणे कठीण झाले नेटवर्क नाही. यातील काही युवकांनी अडकून पडले याचा व्हिडिओ काढला. यावेळी खुप अंधार पडला मोबाईल बॅटरी प्रकाश झोतात ते नदी किनाऱ्यावर थांबले. यात मच्छर चावून फोडून काढत होती. शिवाय प्रत्येक जण घरची काळजी करत होते आपल्या घरातील लोक काळजी करणार या चिंतेने ग्रासले होते. सहा युवक घाबरले होते. आता सकाळ होईपर्यंत सुटका नाही या विचारात होते.
विर्डी सखल धबधबा येथे साखळी गोवा येथील सहा युवक नदी पाञात पाणी वाढले म्हणून अडकून पडले ही माहिती वन विभाग तसेच अग्निशमन दल जवान याना समजताच धाडसी सच आॅपरेशन करून या सहा युवकांना सुखरूप बाहेर काढून त्यांच्या घरी सोडले. नदी पार न करता त्या ठिकाणी थांबल्याने युवक वाचले .
धबधबा ठिकाणी जाताना नदी पाञ पार करताना आपण अडकून पडणार अशा ठिकाणी जीव धोक्यात घालू नये असे आवाहन केले जात आहे.