दोडामार्ग मध्ये गोवा येथील प्रेमी युगुल यांचा इमारत बांधकाम ठिकाणी गैरवर्तन जाब विचारायला गेलेल्या स्थानिक युवकांचा सुरा घेऊन पाठलाग करण्याचा प्रयत्न
दोडामार्ग, दि. २८ जून
गोवा येथील एक युवक युवती प्रेमी युगुल दोडामार्ग पणजी रस्ता ठिकाणी एका इमारत बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी थांबले यावेळी गैरवर्तन सुरू होते. तर तरुणी इमारती बाजूला लघुशंका करण्यासाठी जाणार तोच येथील काही युवकांनी इमारत धारकांनी तिला रोखले. या नंतर या ठिकाणी तरूणीचा मिञ आला. यावेळी स्थानिक युवकांनी ही जागा गैरवर्तन करण्याची नाही येथून चालता हो असे सांगून या युवक युवती यांना इमारत ठिकाणाहून मुख्य रस्ता पर्यंत सोडले यावेळी काही जणांनी पुरावा म्हणून व्हिडिओ शुटींग केली.
स्थानिक युवकांनी इमारत मालक यांनी त्यांना रस्त्यावर सोडून माघारी फिरणार तोच तरुणीचा प्रियकर हातात सुरा घेऊन हल्ला करण्यासाठी चक्क धावून आला यावेळी तीन चार जणांनी घरात पळ काढला म्हणून वाचले ही घटना रविवारी सायंकाळी घडली.
गोवा येथील हे कपल दोडामार्ग मध्ये येऊन गैरवर्तन तसेच सरळ हल्ला करण्यासाठी पुढे सरसावून एक प्रकारे दहशत निर्माण करतात यावरून याना धाक राहिलेला नाही. याची माहिती दोडामार्ग पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.