गोवा येथील खाण कंपनीच्या अर्जानंतर हालचाली; ११० एकर गायरान जमीन ग्रामपंचायतीची असल्याचा दावा, खाण माफियांना जमीन देणार नसल्याचा ग्रामस्थांचा इशारा
दोडामार्ग, दि.१५ जुलै
उसप गावात दोन ठिकाणी जवळपास एकशे दहा एकर जमीन गायरान म्हणून शासकीय नकाशावर आहे. या ठिकाणी उसप ग्रामपंचायत वतीने काजू, बांबू लागवड करून गटार देखील काम केले आहे. हिच गायरान जमीन गोवा येथील खाण धारक कंपनीने जिल्हाधिकारी कडे केलेल्या अर्जानुसार साटेली भेडशी येथील मंडळ अधिकारी गोरे यांनी तहसीलदार यांच्या आदेशानुसार बुधवारी जमीन पाहण्यासाठी उपस्थित राहावे याबाबत कळवले होते. यावेळी जमलेल्या संतप्त उसप ग्रामस्थ यांनी गायरान जमीन खाण माफियांना देणार नाही यावर ग्रामपंचायत हक्क आहे.जमीन परस्पर देण्याचा या प्रशासनाच्या या कृतीचा निषेध करत पाहणीला विरोध करत महसूल कर्मचारी यांना परत पाठवले.
गेल्या काही दिवसांपासून उसप गावातील गायरान जमीन काळा दगड उत्खनन तसेच खडी क्रशर घालण्यासाठी पणजी गोवा येथील एम. एन . नायर यांनी जिल्हाधिकारी कडे अर्ज केला होता दोडामार्ग तालुक्यातील उसप, बोडदे, केर, दरम्यान गायरान जमीन मध्ये काळा दगड आहे हे पाहणी दरम्यान आढळून आले होते यासाठी प्रशासनाच्या वतीने या जमीनी अर्जदार याना दाखवणे पाहणी करणे पंचयादी तयार करणे असे दोडामार्ग तहसीलदार याना कळविले होते.
दोडामार्ग तहसीलदार यांनी साटेली भेडशी मंडळ अधिकारी व तलाठी याना सूचना दिल्या होत्या शिवाय या अगोदर पंचयादी बाबत उसप ऐवजी पिकुळे गावातील नावांचा उल्लेख झाला होता यामुळे संशय निर्माण झाला होता. उसप ग्रामपंचायत याना कुठल्याही प्रकारची कल्पना महसूल विभाग कडून देण्यात आली नव्हती.
