दोडामार्ग तालुक्यात वटपौर्णिमा भक्तिभावात; सुवासिनींची पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना

शेअर करा

पारंपरिक नऊवारी साडी परिधान करून आणि साजशृंगारात सजलेल्या सुवासिनींनी वडाच्या वृक्षाची पूजा करत सात फेरे मारले. सात जन्मी हाच पती लाभावा, अशी प्रार्थना करून एकमेकींना वाण देत दोडामार्ग तालुक्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. 🌿💐🪔

दोडामार्ग, दि. २९ जून

पिढयानपिढया चालत आलेली वट पौर्णिमा आजही मोठया उत्साहात साजरी करत वट पौर्णिमा निमित्ताने वडाची पूजा करून तसेच सात फेरे काढून सात जन्मी हाच पती मिळो अशी प्रार्थना केली जाते. दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात सुहासिनी महिला नटूनथटून नऊवारी साडी परिधान करून सांज अलंकार घालून वडाला धागा बांधून फेऱ्या मारून एकमेकांना वाण देऊन वट पौर्णिमा साजरी केली.

मोर्ले येते वटपोर्णिमा साजरी सातेरी मंदिर येतील वडाला महिलांनी फेऱ्या मारून हा सण साजरा केला साटेली गावात सातेरी मंदिराच्या ठिकाणी असलेल्या वडाच्या झाडाच्या ठिकाणी गावातील शेकडो महिलांनी पूजा करून प्रर्दक्षणा घातल्या तर नवविवाहित जोडपे यांची पहिली वट पौर्णिमा असल्याने धार्मिक विधी करण्यात आल्या.

शेअर करा