कणकवली,दि.२० सप्टेंबर*
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे यांनी रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी अतुल रावराणे यांनी रविंद्र चव्हाण यांच्या सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करत त्यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभावे आणि त्यांच्या हातून जनसेवेचे कार्य अधिक व्यापक व्हावे, अशी सदिच्छा व्यक्त केली. या भेटीदरम्यान विविध सामाजिक विषयांवरही चर्चा झाली. अतुल रावराणे यांनी भैरी भवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक व जनहिताच्या उपक्रमांची माहिती दिली. श्री.चव्हाण यांनीही सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.