कणकवली ऑटो रिक्षा चालक-मालक गणेशोत्सव मंडळाच्या ‘कणकवलीच्या राजा’चे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतले दर्शन

शेअर करा

कणकवली,दि.२४ सप्टेंबर

कणकवली ऑटो रिक्षा चालक-मालक सार्वजनिक गणेशोत्सव कला, क्रीडा मंडळ, कणकवली यांच्या वतीने विराजमान करण्यात आलेल्या ‘कणकवलीचा राजा’ श्री गणरायाचे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आज दर्शन घेतले. यावेळी त्यांनी श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
कणकवली शहरातील ऑटो रिक्षा चालक-मालक सार्वजनिक गणेशोत्सव कला, क्रीडा मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. मंडळाच्या ‘कणकवलीचा राजा’ गणपतीच्या दर्शनासाठी गणेशभक्तांची गर्दी होत असून, परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी मंडळाला भेट देत श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
याप्रसंगी रिक्षा संघटना कणकवली गणेश मंडळाचे अध्यक्ष बाळा वराडकर, सेक्रेटरी मधुसूदन ऊर्फ भाई परब, कृष्णा परब, मनोज वारे, वैभव मालडणकर, हरी निखार्गे, अमित मयेकर यांच्यासह रिक्षा चालक व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन गणरायाचे दर्शन घेण्याचा भक्तिमय सोहळा कणकवलीत सुरू आहे.

शेअर करा