कणकवली,दि.३० जून
सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कणकवली पोलीस ठाणे हद्दीतील नांदगाव तिठा येथे कल्याण मटका जुगारावर धाड टाकून तिघांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत रोख २,३९० रुपये व कल्याण मटका जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
या प्रकरणी गोपाळ सहदेव लोके (वय ७२, रा. असलदे, मधलीवाडी, ता. कणकवली), गणेश गांधी (वय ३५, रा. फोंडाघाट, ता. कणकवली) आणि सुमंत कोरगावकर (रा. फोंडाघाट, ता. कणकवली) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई २९ जून २०२६ रोजी नांदगाव तिठा येथे करण्यात आली. कारवाईदरम्यान रोख रक्कम व कल्याण मटका जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जामसंडेकर तसेच पोलीस कर्मचारी गंगावणे, तवटे आणि देसाई यांनी ही कारवाई पार पाडली. पुढील तपास कणकवली पोलीस करीत आहेत.