कणकवली,दि.०३ सप्टेंबर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
नूतन पदाधिकाऱ्यांचे शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख माजी आ. वैभव नाईक यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
पदाधिकारी पुढीलप्रमाणे - चंद्रकांत उर्फ बाळा गावडे सावंतवाडी विधानसभा संघटक, जयेंद्र परुळेकर प्रवक्ते सिंधुदुर्ग जिल्हा, संजय गावडे वेंगुर्ले उपजिल्हा प्रमुख, लक्ष्मण रावराणे वैभववाडी उपजिल्हा प्रमुख, रामराव उर्फ चंदन गावकर दोडामार्ग उपजिल्हा प्रमुख, वसंत खानविलकर वैभववाडी उपजिल्हा संघटक, लक्ष्मण आयनोडकर दोडामार्ग उपजिल्हा संघटक, विनोद सांडव मालवण उपजिल्हा संघटक, राजू राठोड कणकवली तालुकाप्रमुख, रमाकांत मोरे वैभववाडी तालुका संघटक, निशांत तोरस्कर सावंतवाडी तालुका संघटक, विजय नाईक वेंगुर्ले तालुका संघटक, राजेश टंगसाळी कुडाळ उपतालुका संघटक, नारायण उर्फ आप्पा मांजरेकर ओबीसी सेल कुडाळ तालुका संघटक यांची निवड करण्यात आली आहे.