Sawantwadi News : सावंतवाडी फूल मार्केटमधील विक्रेत्यांसाठी लवकरच युरीनल सुविधा!

शेअर करा

विक्रेत्यांची दीर्घकाळाची मागणी पूर्णत्वास; वाघ पाणंद येथे सुविधा उपलब्ध करून देण्याचा नगरपरिषदेचा निर्णय!

सावंतवाडी,दि.०२ नोव्हेंबर

सावंतवाडी नगरपरिषद क्षेत्रातील फूल मार्केट मधील विक्रेत्यांची दीर्घकाळाची मागणी लक्षात घेऊन प्रशासनाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. फूल मार्केटमधील विक्रेत्यांची गैरसोय दूर करण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता व आरोग्य अबाधित राखण्यासाठी वाघ पाणंद येथे लवकरच युरीनल सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
​नगराध्यक्षा श्रीम. श्रद्धा लखमराजे भोसले यांच्या सूचनेनुसार नगरपरिषद प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात येत आहे.
​विक्रेत्यांना दिलासा, आरोग्याला प्राधान्य
​फूल मार्केट परिसरात दैनंदिन व्यवहारासाठी येणाऱ्या विक्रेत्यांना स्वच्छतागृहाअभावी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. वाघ पाणंद येथे ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे विक्रेत्यांची ही मोठी गैरसोय दूर होण्यास मदत होईल. तसेच, परिसरातील स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य सुस्थितीत राखण्यासाठी या सुविधेचा मोठा हातभार लागणार आहे. ​नगराध्यक्षा सौ. श्रद्धा लखमराजे भोसले आणि आरोग्य सभापती श्री. सुधीर आडीवरेकर यांनी सर्व विक्रेत्यांना व नागरिकांना आवाहन केले आहे ​नगरपरिषदेतर्फे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या या युरीनल सुविधेचा सर्वांनी योग्य व जबाबदारीने वापर करावा.
​परिसरात कुठेही अस्वच्छता होणार नाही याची काळजी घ्यावी.
​सावंतवाडी शहर सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपरिषद प्रशासनास पूर्ण सहकार्य करावे.

शेअर करा