जिल्हाप्रमुख वैभव नाईक, सुशांत नाईक यांनी केले अभिनंदन
कणकवली,दि.०३ सप्टेंबर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये कणकवली तालुकाप्रमुखपदी राजू राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नूतन तालुकाप्रमुख म्हणून निवड झाल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आ. वैभव नाईक तसेच कणकवलीचे उपनगराध्यक्ष व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी राजू राठोड यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी विलास गुडेकर, उत्तम लोके, प्रथमेश सावंत, रूपेश आमडोसकर, राजू राणे, हर्षद गावडे, रोहित राणे, राजू शेट्टी, प्रमोद सावंत आदी उपस्थित होते.