कणकवली : ओसरगावचे विजय वासुदेव तावडे यांचे निधन

शेअर करा

कणकवली,दि.०१ जुलै

तालुक्यातील ओसरगाव येथील विजय वासुदेव तावडे (वय ५९) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी (दि. ३० जून) निधन झाले. ते ओरस येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे कर्मचारी म्हणून कार्यरत होते. अवघ्या चार महिन्यांनी ते सेवानिवृत्त होणार होते.

ते ओएनजीसीचे सेवानिवृत्त कर्मचारी महादेव तावडे यांचे बंधू, तर वागदे येथील आरोग्य सेविका अश्विनी तावडे यांचे वडील होते. तसेच जाणवलीचे माजी सरपंच काका राणे यांचे मेहुणे आणि मातोश्रीचे स्वीय सहाय्यक रविंद्र म्हात्रे यांचेही मेहुणे होते.

बुधवारी (दि. १ जुलै) ओसरगाव पटेलवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी, मुलगा, भाऊ, वहिनी तसेच मोठा मित्रपरिवार असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शेअर करा