संजना सावंत यांनी घरोघरी जाऊन दिला मदतीचा हात
कणकवली ,दि.२० जुलै
नाटळ-सांगवे विभागाचे जिल्हा परिषद सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या संकल्पनेतून विभागातील गरजू अपंग व्यक्तींना स्वखर्चातून वॉकरचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अपंग व्यक्तींना दैनंदिन जीवनात आधार मिळणार असून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.
या उपक्रमांतर्गत दारिस्ते येथील वैशाली हळवे तसेच दिगवळे येथील मंगला सोरप यांना त्यांच्या घरी जाऊन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते वॉकर प्रदान करण्यात आले. याशिवाय नाटळ-सांगवे विभागातील इतर गरजू अपंग व्यक्तींनाही स्वखर्चातून वॉकर उपलब्ध करून देण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सदस्या राजश्री पवार, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, मयुरी मुंज, अंजली शिरसाठ, आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते.
या मदतीमुळे अपंग व्यक्तींना चालणे-फिरणे अधिक सुलभ होणार असून, गरजूंसाठी सातत्याने मदतीचा हात पुढे करणाऱ्या संदेश उर्फ गोट्या सावंत आणि संजना सावंत यांचे लाभार्थींनी मनापासून आभार व्यक्त केले.
परिसरातील नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.