पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी ; घरोघरी जात छोट्या बाळांना पाजले पोलीओचे डोस
कणकवली,दि.०१ जुलै
कलमठ जिल्हा परिषदचे सदस्य सुप्रिया मेस्त्री यांनी वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा ताईंसोबत घरोघरी जाऊन लसीकरण उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री यांनी या उपक्रमातून आदर्श निर्माण केला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र वरवडे रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष आणि बाल कल्याण समिती सदस्य म्हणून माझी जबाबदारी असून आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे, आरोग्य केंद्रा बद्दल विश्वासहर्ता वाढवणे ही आहे. जिल्हा परिषद सदस्या म्हणून माझी जबाबदारी आहे , म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत लसीकरण मोहिमेत सहभागी झाल्याचे सुप्रिया मेस्त्री यांनी सांगितले. यावेळी आरोग्य सहाय्यक महेश आचरेकर, आरोग्यसेविका ऐश्वर्या कवठणकर,आशा संस्कृती गोठणकर, ज्योत्स्ना गुडेकर, प्राची पवार, विभावरी कांबळे, सौ.गवळी उपस्थित होत्या.