कुडाळ : अन्नसुरक्षा नवीन कायदे माहिती व प्रशिक्षण शिबीर

शेअर करा

कुडाळ,दि.२७ जून
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व हॉटेल व्यावसायिक, खानावळ, बेकरी, केक शॉप, मिठाई, किराणा व्यापारी, चायनीज सेंटर, कोकणी मेवा, वडापाव सेंटर तसेच अन्य खाद्यपदार्थ विक्रेत्या व्यावसायिकांना अन्नपदार्थांचे पॅकेजिंगबाबत आणि बदललेल्या अन्नसुरक्षा नियमांबाबत संपूर्ण माहिती देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघातर्फे माहिती व मार्गदर्शन शिबिर सोमवार, दि. २९ जून २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता मराठा समाज हॉल, कुडाळ हायस्कूल शेजारी, कुडाळ येथे आयोजित केले आहे. या कार्यक्रमाला महासंघाच्या विनंतीवरून जिल्ह्याचे अन्नसुरक्षा प्रशासनाचे उपायुक्त गायकवाड, अन्नसुरक्षा निरीक्षक अभय चंदनशिवे तसेच महासंघाचे पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.


जिल्ह्यातील किरकोळ खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी खालील दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे. यामुळे प्रत्यक्ष माहिती आणि प्रश्न उत्तरामुळे आपल्याला या प्रशिक्षणाचा फायदा होईल व दंडात्मक कारवाई टाळता येईल. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्न व खाद्यपदार्थांसंबंधित सर्व व्यापाऱ्यांनी या शिबिराला उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, सर्व पदाधिकारी, हॉटेल संघटना, तालुकाध्यक्ष आणि सभासद यांनी केले आहे. हे प्रशिक्षण मोफत आहे.

शेअर करा