जिल्हा भंडारी समाजाचे जिल्हाध्यक्ष हेमंत करंगुटकर, जिल्हा भंडारी समाजाचे नेते अतुल बंगे यांचे गौरवोद्गार
कुडाळ,दि. १५ आॅगस्ट
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भंडारी समाजाचे जिल्हा भंडारी भवन हे भंडारी समाजाचे स्वप्न साकारण्याचे काम सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी करुन “मायनायक भंडारी” हे जिल्हा नियोजन सभागृहाला नाव देऊन भंडारी समाजाची मान उंचावली आहे असे गौरवोद्गार सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाजाचे जिल्हाध्यक्ष हेमंत करंगुटकर, जिल्हा भंडारी समाजाचे नेते अतुल बंगे यांनी काढले.
आज १५ ऑगस्ट भारत देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांची जिल्हा भंडारी समाजाचे जिल्हाध्यक्ष हेमंत करंगुटकर, जेष्ठ नेते अतुल बंगे, शिक्षण व आरोग्य माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर, जिल्हा कार्याध्यक्ष राजू गवंडे, नंदकिशोर कोयंडे, संतोष वैज, बंड्या पराडकर सावंतवाडी तालुका अध्यक्ष प्रसाद आरंवदेकर यांनी भेट घेतली. यावेळी जिल्हा भंडारी समाजाच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार व्यक्त करताना जिल्ह्यातील भंडारी समाज मोठ्या प्रमाणात असताना या समाजाची दखल आजपर्यंत कुठल्याच पालकमंत्र्यांनी घेतली नव्हती. परंतु, आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक समाजाला न्याय देण्याचे काम करुन जिल्ह्याला न्याय देणारे पालकमंत्री मिळालेत याचा आम्हाला अभिमान असून आमच्या भंडारी समाजाचे नामोल्लेख करुन मायनायक भंडारी यांचा इतिहास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेसमोर आणून .मायनायक भंडारी असे नामकरण नियोजन सभागृहाला देऊन अखंड भंडारी समाजाचा सन्मान पालकमंत्री ना नितेश राणे यांनी केला आहे. आज एक वर्ष पूर्ण झाले मायनायक भंडारी सभागृह नियोजन सभागृहाला नामकरण देऊन झाले म्हणून भंडारी समाज शिष्टमंडळाने आज सभागृहाला या शिष्टमंडळाने भेट दिली. यावेळी भंडारी भवनाचे भूमिपूजन गणपती उत्सव काळात केले जाईल. तत्पुर्वी, सगळ्या कायदेशीर बाबी पडताळून घ्या असे आदेश पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांना दिले. आपण राज्य शासनाकडून आवश्यक त्या सर्व कामांची पूर्तता करु असे आश्वासन शिष्टमंडळाला देत भंडारी समाजाच्या पाठीशी आपण पालकमंत्री म्हणून सदैव असणार अशी ग्वाही त्यांनी दिली .