तळेरे बाजारपेठ चौकात एलईडी लॅम्पची प्रकाश योजना

शेअर करा

बाजारपेठ मित्र मंडळाचा पुढाकार

तळेरे,दि. २० ऑगस्ट

तळेरे बाजारपेठ चौकात गेल्या काही दिवसांपासून अंधाराचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांच्या सोयीसाठी या ठिकाणी प्रकाशयोजना करणे गरजेचे होते.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ वाढणार असल्याने चौकात पुरेशा प्रकाशाची व्यवस्था असावी, या उद्देशाने तळेरे बाजारपेठ मित्र मंडळाच्या वतीने चौकात एलईडी लॅम्प बसविण्यात आला आहे.

या प्रकाशयोजनेमुळे बाजारपेठ चौकाचा परिसर प्रकाशमान झाला असून, रात्रीच्या वेळी नागरिक, व्यापारी व ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीनेही या उपक्रमाचा फायदा होणार आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतील सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने तळेरे बाजारपेठ मित्र मंडळाने घेतलेल्या या उपक्रमाचे व्यापारी व नागरिकांकडून आभार व कौतुक होत आहे.

शेअर करा