मालवण येथील गुटखा विक्री प्रकरणी अटक संशयितास मे. सत्र न्यायालयात सशर्त जामीन मंजूर

शेअर करा

संशयितातर्फे ॲड. स्वरुप नारायण पई, ॲड यतिश खानोलकर यांनी काम पाहिले.

मालवण,दि. २० जून

मालवण तारकर्ली नाका येथील गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ साठवणुकीच्या गुन्ह्यामधील अटक संशयीत अमित अशोक सावंत वय 40 वर्षे, राह. भरड मालवण यास ओरोस येथील सत्र तथा जिल्हा न्यायालयाने ५० हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे संशयितातर्फे मालवणचे ॲड. स्वरुप नारायण पई, ॲड यतिश खानोलकर यांनी काम पाहिले.

यासंबधीचे अधिक वृत्त असे की, सिंधुदुर्गच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने मालवण तारकर्ली नाका येथे केलेल्या छाप्यामध्ये महालक्ष्मी जनरल स्टोअरच्या बाजूच्या शेडमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा मिळून आल्याने पोलिसांनी अमित अशोक सावंत रा भरड मालवण याचे विरूद्ध मालवण पोलीस ठाण्यात दि. ३ जून २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता कलम 123 व अन्नसुरक्षा आणि मानके कायदा कलम 26(2), 27(3), 30(2) व 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामधे संशयितास अटक करुन मालवण न्यायालयात हजर केले असता मालवण न्यायालयाने संशयीतास दि. ६ जून २०२६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्यानंतर संशयीताच्यावतीने ओरोस येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनअर्ज करण्यात आला होता. या जामीन अर्जाचे सुनावणीअंती जिल्हा व सत्र न्यायालयाने संशयीतास रक्कम ५० हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला. यामध्ये संशयीताने तपासकामात ढवळाढवळ न करणे, साक्षीदारांवर दबाव न आणणे व पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटी घालण्यात आल्या आहेत.

शेअर करा