विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या शिक्षण विभागाच्या वतीने राज्यस्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मालवण,दि. २१ जून
या स्पर्धेसाठी ‘हाकला भोंदू, सुखाने नांदू, ‘नीट’ नेटकी शिक्षण पद्धती?, लोकशाही आणि तरुणाई, युद्धाच्या झळांनी होरपळली भारताची अर्थव्यवस्था, सरकारी योजना: कल्याणकारी की रेवडी? चित्ती असू द्यावे समाधान असे विषय आहेत. निबंधाची शब्द मर्यादा १,५०० असून वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर आपले विचार निबंधरूपाने लिहून त्यावर नाव,पत्ता व भ्रमणध्वनी क्र.नमूद करावा. टंकलिखित किंवा सुवाच्च अक्षरातील निबंध संस्थेच्या ११९,आनंद इस्टेट, दुसरा मजला,साने गुरुजी मार्ग,चिंचपोकळी (प),मुंबई -४०० ०११ या पत्त्यावर पाठवावेत किंवा निबंधाची एक स्कॅन कॉपी पीडीएफ स्वरुपात संस्थेच्या [email protected] या ई-मेल आयडीवर ९ जुलै पूर्वी पाठवावेत. इमेल मधील विषयात खुली राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२६ असे नमूद करावे. निबंध स्पर्धेसाठी प्रथम- रु.२००१, द्वितीय- रु.१५०१ आणि तृतीय- रु. १००१ आणि प्रमाणपत्र अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.
तसेच २७ जून रोजी काव्यवाचन स्पर्धा तसेच ११ जुलै रोजी खुली प्रश्नमंजुषा स्पर्धा तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी २८ जून रोजी ५ वी ते १० वी साठी मराठी हस्ताक्षर स्पर्धा, १ ली ते १० साठी चित्रकला स्पर्धा, तसेच ५ जुलै रोजी १ ली ४ थी साठी पाठांतर स्पर्धा तसेच ५ वी ते १० वी व महाविद्यालयीन मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. वरील सर्व स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य असणार आहेत. अधिक माहितीसाठी संकेत शिर्के ७०३९८८८५६२, हार्दिक सकपाळ ९३७२६०८६८७ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.