मुंबई : गिरणी कामगारांच्या मुला-मुलींचा गं.द.आंबेकर जयंतीदिनी शैक्षणिक गुणगौरव !

शेअर करा


मुंबई,दि.२५ जून

राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे कामगार महर्षी स्व.गं.द.आंबेकर यांच्या जयंतीदिनी गिरणी काम गारांच्या यंदाच्या इयत्ता दहावी,बारावी परीक्षेतील उत्तीर्ण मुला-मुलींचा गं.द.आंबेकर यांच्या २१ ऑगस्ट‌ रोजी महात्मा गांधी सभागृहात संपन्न होणाऱ्या जयंतीदिनी शैक्षणिक गुणगौरव होणार आहे!
या औचित्याने विहित नमुन्यातील फॉर्म येत्या १५ ऑगस्ट पर्यंत भरून द्यायचे आहेत.खास बाब म्हणून गिरणी कामगारांच्या नात, नातू यांचाही स्व. गं.द आंबेकर शैक्षणिक गुणगौरव होणार आहे.
त्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज १५ जुलै २०२६ पासून‌ वितरित करण्यात येणार आहेत.अर्ज घेताना गुणपत्रिकेची सत्यप्रत‌ व ‌अर्ज देताना झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे.अर्ज सकाळी१० ते ५ या कार्यालयीन वेळेत देण्यात व घेण्यात येतील.तरी कामगारांनी स्व.गं.द.आंबेकर शैक्षणिक सोहळ्यात सहभागी व्हावे,असे ‌आवाहन‌ संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर आणि सरचिटणीस ‌गोविंदराव मोहिते यांनी केले आहे.

शेअर करा