उत्कर्ष समूह महिला बचत गट व गोवा स्वयंसेवी आरोग्य संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात महिलांची मोफत आरोग्य तपासणी.
दोडामार्ग, दि. २० जुलै
सासोली येथील उत्कर्ष समूह महिला बचत गट तसेच गोवा स्वयंसेवी आरोग्य संघटना स्थापन
वतीने नवदुर्गा सभागृह सासोली येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात सत्तर महिलांनी लाभ घेतला.
गोवा स्वयंसेवी आरोग्य संघटनेच्या वतीने दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात आरोग्य तपासणी शिबिरे घेतली जातात अशा प्रकारे शिबिर सासोली येथे घेण्यात आले.
यावेळी डॉ. आकांक्षा मडकईकर – वैद्यकीय अधिकारी प्रविण कांबळे प्रकल्प कार्यकारी शकुंतला कवठणकर, प्रकल्प परिचारिका शंकर देसाई – डेटा स्टाफ
कृष्णा किडजी – चालक
आरोग्य शिबिर घेण्यात आले
मार्गदर्शन शिवसेना कार्यकर्ते गुरुदास सावंत यांनी केले. यावेळी उत्कर्ष समूह महिला बचत गट महिला उपस्थित होत्या.