सावंतवाडी : संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त कलंबिस्त हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना सुपारी रोपांचे वाटप

शेअर करा

सह्याद्री फाऊंडेशनचा उपक्रम; विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न

सावंतवाडी,दि. २० ऑगस्ट

शिवसेना जिल्हाप्रमुख व सह्याद्री फाऊंडेशनचे माजी अध्यक्ष संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तच्या विद्यार्थ्यांना दिडशे सुपारी रोपांचे वितरण करुन विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर कलंबिस्त पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजी सावंत,सचिव यशवंत राऊळ, सहसचिव चंद्रकांत राणे, संचालक सदस्य सुरेश राऊळ,वसंत सावंत,सूर्यकांत राजगे,गजानन राऊळ, सुभाष सावंत,दत्ताराम पवार,वेर्ले ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना कार्यकर्ते बाळू गावडे, प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते या सुपारी रोपांचे प्रशालेतील सर्व विद्यार्थाना वितरण करण्यात आले व त्यांचे योग्य संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले. संस्था सचिव यशवंत राऊळ यांनी सह्याद्री फाऊंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल फाऊंडेशनचे कौतुक करुन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांना वाढदिवसानिमित्त व त्यांच्या एकूण राजकीय कारकिर्दीकरीता संस्थेच्या व प्रशालेच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव सर यांनी उपस्थितांचे आभार मानले तर सूत्रसंचालन किशोर वालावलकर यांनी केले.

शेअर करा