सावंतवाडी : माजगाव हरसाव़तवाडा येथील जि प शाळेतील विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप

शेअर करा

सावंतवाडी ,दि. २० ऑगस्ट

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त माजगाव जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांच्या कल्पनेतून आणि पुढाकारातून माजगाव हरसावंतवाडा येथील जिल्हा परिषद माजगाव शाळा नंबर ३ मधील विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थितांनी संजू परब यांना उदंड आयुष्याच्या व पुढील राजकीय – सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या
यावेळी माजगाव उपसरपंच रिचर्ड डिमेलो माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संजय कानसे , ज्ञानेश्वर सावंत, गीता कासार, विशाखा जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख संजय माजगावकर, माजगाव शाखाप्रमुख रुपेश नाटेकर ,भाजप अध्यक्ष श्याम कासार ,शाळेच्या मुख्याध्यापक मंजिरी शेंडे, शिक्षिका साक्षी शेडगे अंगणवाडी सेविका रश्मी मेस्त्री ,प्रणिता सावंत ,शाळा समिती अध्यक्ष आरोही बि भिडे बीड्ये, जान्हवी सावंत ,प्रीती पांढरे श्रीमती परीट आणि आदी उपस्थित होते

शेअर करा