केळुस येथे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण; आधुनिक श्री पद्धती, रोपवाटिका, चारकोलचा वापर आणि कोळपणी तंत्राची शेतकऱ्यांना माहिती
सावंतवाडी,दि.२० जुलै
सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात असणारी भात लागवडीसाठीची जमीन, भात शेतीत उत्पादन खर्च व उत्पन्न यांचा ताळमेळ न बसणे यासाठी कमी खर्चिक व कमी मेहनतीचे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय किसान संघ सिंधुदुर्ग च्या वतीने SRI भात लागवड प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
श्री लक्ष्मण वराडकर कालवी बंदर केळुस तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी SRI (SYSTEM OF RICE INTESIFICATION) म्हणजे सघन पद्धतीने भात लागवड प्रशिक्षण प्रात्यक्षिकासह घेण्यात आले
यामध्ये श्री पद्धतीची माहिती, प्रत्यक्ष रोप वाटिका त्यामध्ये चारकोल चा उपयोग, दोरी वरची लागवड, कोळपणी या सर्व टप्प्यांचा समावेश करण्यात आला.
या प्रशिक्षणाला गत दहा वर्ष श्री पद्धत अवलंबणारे व राज्यस्तरीय भात पीक स्पर्धेचा प्रथम क्रमांक विजेते श्री लक्ष्मण उर्फ आबा वराडकर व मालवणचे उप कृषी अधिकारी श्री धनंजय गावडे यांनी मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणाला केळूस गावचे सरपंच श्री योगेश शेटये,महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री अनिकेत कदम, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक वेंगुर्ला श्री धनंजय गोळम, कृषी सहाय्यक श्री ज्ञानेश्वर सोनटक्के, श्री जीवन परब तसेच पाणी फाउंडेशन चे फील्ड ऑफिसर श्री नवनाथ शिंदे व श्री अविनाश पाटील तसेच भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष श्री तानाजी सावंत व जिल्हा कार्यकारणी उपस्थित होते.
या प्रशिक्षणाला सिंधुदुर्गातील विविध गावातील शेतकरी उपस्थित राहिले व कमी मेहनत व कमी खर्चिक पण जास्त उत्पन्न देणारी श्री भात लागवड आपल्या गावात करण्याचा संकल्प केला.