सावंतवाडी,दि.१४ सप्टेंबर
तथागत गौतम बुद्धाच्या धम्माची खास आणि अद्वितीय अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत . मानवी इतिहासात जगात अनेक धर्म आणि विचार प्रवाह उदयाला आले पण बौद्ध धम्म हाच केवळ जागतिक स्तरावर स्थिर झालेला आणि जनमानसात रुजलेला एकमेव धम्म आहे.
. हा धम्म म्हणजे धर्म नसून ती एक जीवन जगण्याची कला असल्याचे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेच्या महिला विभागाचा जिल्हा सचिव मानसी मंगेश कदम यांनी आरोंदा येथे केले . आरंदा सिद्धार्थनगर येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने वर्षावास प्रवचन कार्यक्रमाचे रविवारीआयोजन करण्यात आले होते त्यावेळी श्रीमती कदम बोलत होत्या .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष दिलीप जाधव हे होते. प्रारंभी बुद्ध पूजा, त्रिशरण ,पंचशील इत्यादी धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर पत्रकार मोहन जाधव यांच्या व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रारंभी तालुका संघटक कांता जाधव यांनी प्रास्ताविक केले तर सिद्धार्थ जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले संस्कार विभागाचे सचिव मिलिंद नेमळेकर यांनी वर्षावास कार्यक्रमाचा आढावा घेतला त्यानंतर श्रीमती मानसी कदम यांनी बुद्धी प्रामाण्य वाद आणि विज्ञानवाद ,मानव केंद्रित धम्म ,समता आणि बंधुभाव, प्रज्ञा शील आणि करुणा चार आर्य सत्य व अष्टांगिक मार्ग अशा विविध विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले तर गौतमी कांबली यांनीही बौद्ध धम्माचे महत्त्व विशद करणारे अनेक महात्मे सांगून बौद्ध धर्म हाच जगातील एकमेव मानव निर्मित मानव कल्याणकारी धर्म असल्याचे स्पष्ट केले. शेवटी अध्यक्ष पदावरून बोलताना दिलीप जाधव यांनी वर्षावासाचे महत्त्व सांगून तालुक्यात सुरू असलेल्या वर्षावास मालिकेची सविस्तर माहिती दिली तर शेवटी चंद्रशेखर जाधव यांनी आभार मानले तर ममता जाधव यांनी सुप्रसिद्ध अभिनेते सुश्रुत जोशी यांनी बौद्ध धम्म आणि मी यावर त्यांना आलेले बौद्ध धम्मा बाबत अनुभूती सांगणारे त्याने लिहिलेले पोस्टचे वाचन केले.यावेळी महिला विभाग अध्यक्ष मीनाक्षी तेंडुलकर जिल्हा संघटक ममता जाधव, यांच्यासह पल्लवी जाधव ,अश्विनी जाधव ,मंगेश कदम ,मोहन जाधव, मोहन माजगावकर ,वासुदेव जाधव ,बी पी कांबळे, सुनील जाधव ,गौतम कांबळे ,शिवाजी जाधव ,कांता जाधव , साबाजी जाधव , प्रसाद जाधव, विष्णू जाधव सद्गुरु जाधव प्राची जाधव मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते.