​सावंतवाडी : नॅचरोपॅथी व योगामध्ये डॉक्टर होण्याचा कु. आद्या कशाळीकर हिचा बहुमान; जिल्ह्यातील पहिलीच विद्यार्थिनी

शेअर करा

सावंतवाडी,दि.२६ जून
​सावंतवाडीतील प्रसिद्ध इंजिनियर व उद्योजक नाना कशाळीकर आणि मृणालिनी कशाळीकर यांची नात, तसेच इंजिनियर अद्वैत कशाळीकर यांची सुकन्या कु. आद्या कशाळीकर हिने यंदाच्या वर्षी डॉक्टर बनण्याचा बहुमान मिळवला आहे. बेंगलोर येथील प्रसिद्ध ‘स्वामी विवेकानंद योगा अनुसंधान संस्थान’ येथून तिने ‘बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अॅण्ड योगा’ ही पदवी यशस्वीरीत्या संपादन केली आहे. नॅचरोपॅथी व योगा या क्षेत्रात डॉक्टर (पदवीधारक) होणारी ती जिल्ह्यातील पहिलीच विद्यार्थिनी ठरली आहे.


​कु. आद्या हिला लहानपणापासूनच जिम्नॅस्टिक्सची विशेष आवड होती. याच आवडीच्या प्रेरणेतून तिने या वेगळ्या आणि आरोग्याभिमुख वैद्यकीय क्षेत्राची निवड केली.


​मळगाव येथे सुरू होणार नॅचरोपॅथी हॉस्पिटल:
शिक्षणाची पदवी पूर्ण झाल्यानंतर आता गोव्यामध्ये तिचा नवीन जॉब सुरू होणार आहे. यासोबतच, स्थानिक नागरिकांच्या आरोग्यासाठी मळगाव (सावंतवाडी) येथील लक्ष्मी-नारायण नगरमधील इंजि. कशाळीकर यांच्या स्वतःच्या जागेत ती ‘नॅचरोपॅथी हॉस्पिटल’च्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देणार आहे. या परिसरातील व पंचक्रोशीतील नागरिकांनी या आधुनिक व पारंपरिक उपचार पद्धतीचा आणि सेवेचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा