सावंतवाडी: व्हॉट्सॲप नंबर डिलीट झाल्याने शुभेच्छांना उत्तर देता आले नाही-आमदार दीपक केसरकर

शेअर करा

वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव; जनतेच्या प्रेमाबद्दल व्यक्त केली कृतज्ञता, रिप्लाय देता न आल्याची खंत

२० जुलै रोजी उपजिल्हा रुग्णालयात के.ई.एल.ई. रुग्णालय, बेळगावच्या सहकार्याने मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन

सावंतवाडी, दि. १९ जुलै
माझ्यावर जनतेने जिवापाड प्रेम केले आहे आणि याच प्रेमाच्या जोरावर मला चार वेळा बहुमताने निवडून दिले आहे. जनतेच्या याच अथांग प्रेमाची प्रचिती दरवर्षी माझ्या वाढदिवसाला पाहायला मिळते. यंदाही समर्थकांनी आणि नागरिकांनी मला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. मात्र, सोशल मीडियावर शुभेच्छा देणाऱ्या अनेकांचे आभार मानणे शक्य झाले नाही, कारण माझा व्हॉट्सॲप नंबर डिलीट झाला आहे. त्यामुळे इच्छिूंना वेळेत रिप्लाय देता न आल्याचे मोठे दुःख मनाला वाटत आहे, अशी भावना माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केली.


​आमदार दीपक केसरकर पुढे म्हणाले की, वाढदिवसानिमित्त हितचिंतकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. प्रत्यक्ष तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी संदेश पाठवले. परंतु, व्हॉट्सॲप नंबर तांत्रिक कारणामुळे डिलीट झाल्याने मला वेळेत अनेकांचे आभार मानता आले नाहीत. याबद्दल त्यांनी खंत व्यक्त करत सर्व शुभेच्छा देणाऱ्यांचे मनापासून आभार मानले आहेत.
तसेच उद्या सोमवार दि.२० जुलै रोजी उपजिल्हा रुग्णालयात मोफत महा आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. बेळगांव येथील के इ ली रुग्णालयाच्या मदतीने हे शिबिर होत आहे. रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रिया करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे असे त्यांनी सांगितले.

शेअर करा