सावंतवाडी : गुरूंच्या वाढदिवसानिमित्त सुभाष परुळेकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना सुपारी रोपे, शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप

शेअर करा

सावंतवाडी ,दि.०१ जुलै

मळेवाड पंचक्रोशी विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा माजी विद्यार्थी संघाचे सचिव सुभाष परुळेकर यांनी आपले गुरुतुल्य मार्गदर्शक पारसजी राय यांच्या वाढदिवसानिमित्त मळेवाड पंचक्रोशी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना सुपारी रोपे, शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने त्यांचा वाढदिवस साजरा केला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याबरोबरच शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनीही सुपारीच्या रोपांचे संगोपन करण्याचा संकल्प व्यक्त केला.
यावेळी सुभाष परुळेकर, प्रशाळेचे मुख्याध्यापक तानाजी साळसकर,संगीता रेडकर,हेमांगी साटेलकर, वेदांगी राऊळ,मदन मुरकर , संदेश मोरजकर,अमर नेमण कर्मचारी, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी सुभाष परुळेकर यांच्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी पारसजी राय यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. पर्यावरण संवर्धन, शिक्षणप्रेम आणि समाजसेवेचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला.
कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार तानाजी साळसकर यांनी मानले.

शेअर करा