वन विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभागाची संयुक्त कारवाई; घाट परिसरातील उर्वरित धोकादायक झाडेही हटविण्याची मागणी
सावंतवाडी,दि.१५ जून
आंबोली घाटात धोकादायक स्थिती मध्ये दरड – मोठा अपघात होण्याची शक्यता.
आंबोली गाव हद्दीतील धोकादायक झाडे राष्टीय महामार्ग व वन विभाग यांच्या संयुक्त अभियान राबवून छाटण्यात आले आहेत.
याचे सर्व स्तरातून आभार व्यक्त करण्यात येत आहे.
आंबोली गाव हद्दीतील सार्वजनिक बांधकाम विभागा च्या आत्यारीतील रस्त्यावरील धोकादायक झाडे ही छाटण्यात यावेत. तसेच आंबोली घाट परिसरात अजूनही बरीचशी धोकादायक झाडे आहेत ती देखील वन विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभागाने संयुक्त कार्यवाही करून छाटणी करावी.
आंबोली घाटात श्री देव पूर्वीचा वस मंदिर च्या पुढील बाजूस धोकादायक स्तिथीत दगड पडण्याच्या स्तितीत आहे त्या बाबतही तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग विभाग कडे कारण्यात आली आहे.
आंबोली घाट मध्ये बरेच सावरक्षक कटडे हे तुटलेल्या स्थितीत आहेत त्या बाबतीत तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी
लवकरच आंबोली परिसरात मान्सून पर्यटन सुरु होणार व त्यावेळी पाऊस व धुके या मुळे मोठया प्रमाणात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.