सावंतवाडी नगरपरिषदेसमोर संजय नार्वेकरांचे उपोषण

शेअर करा

न झालेल्या गटाराचे बिल अदा केल्याच्या चौकशीसह जमीन एफएसआयसाठी वापरल्याचा आरोप; नगराध्यक्षांकडून चर्चेचे आश्वासन

सावंतवाडी,दि.१५ ऑगस्ट

मुरलीधर मंदिर समोर न झालेल्या गटाराचे बील ठेकेदाराला अदा केले असून त्याची चौकशी करण्यात यावी. तसेच बिल्डरकडून झालेल्या भंगाबाबत माझ्या जमीनीचा भाग एफएस‌आयसाठी वापरल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते संजय नार्वेकर यांनी उपोषण छेडले.‌ सावंतवाडी नगरपरिषदेच्या समोर ते उपोषणाला बसले होते. नगराध्यक्षांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा करत मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.

श्री.‌ नार्वेकर म्हणाले, गेल्या ८ वर्षात माझी समस्या सोडवण्याऐवजी वाढवली आहे. मुख्याधिकारी आणि कार्यालयाचा कारभार हा भ्रष्टाचाराची असून अधिनियम, घटनेच्या विरोधात काम इथे होत असल्याचा आरोप त्यांनी केला. या उपोषणाला माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी भेट दिली. यावेळी श्री. नार्वेकर यांनी पालिकेचे अधिकारी भ्रष्टाचारात गुंतल्याचा आरोप केला. प्रशासकीय काळातील गोष्टींची चौकशी करा अशी मागणी केली. तसेच लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले.

शेअर करा