वृक्षारोपण, वृक्ष रक्षाबंधन, औषधी वनस्पतींची ओळख व पौष्टिक पदार्थांची मेजवानी; विद्यार्थी-पालकांचा उत्स्फूर्त सहभाग
सावंतवाडी, दि.०३ सप्टेंबर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर ६ मध्ये रानभाजी महोत्सव, वृक्षारोपण, वृक्ष रक्षाबंधन, औषधी वनस्पतींची ओळख आणि पौष्टिक पदार्थांची मेजवानी,असे अनेकविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झालेत.यावेळी सावंतवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री कमलाकर ठाकूर , सावंतवाडी नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती श्रीम.दिपाली भालेकर ,माजी केंद्रप्रमुख श्रीम.सरिता मुननकर , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीम.समिक्षा खोचरे, उपाध्यक्षा श्रीम.पूनम तुयेकर, शिक्षण तज्ञ श्री दिलीप भालेकर , श्री. गुरुप्रसाद तेजम ,श्रीम.जान्हवी वारीक ,श्रीम.संगिता चव्हाण , ज्येष्ठ शिक्षिका श्रीम.सायली लांबर, मुख्याध्यापक श्री केशव जाधव विद्यार्थी,पालक वर्ग इ.मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.तसेच शाळेच्या आवारातील कल्पवृक्षाला विद्यार्थी व शिक्षकांनी मिळून तयार केलेली पानांफुलांची पर्यावरण पूरक राखी बांधून निसर्ग रक्षणाचा संकल्प सर्वांनीच केला.. निसर्गा प्रति कतज्ञतेची भावना शाळेच्या विद्यार्थ्यांनी कृतीतून आणि गाण्यातून दाखवून दिली.
तद्नंतर मान्यवरांच्या हस्ते फीत कापून सुंदर आणि दर्जेदार प्रकारे आयोजित केलेल्या रानमहोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले .रानमहोत्सवात ठेवण्यात आलेल्या अळूची पाने ,शेवगा,कर्टुले, केळफूल,भारंगी,अंबाडी,टाकळा,चिवारीचे कोंब,पेवगा,कुर्डू,भोपळ्याची फुले,त्रिफळे यासारख्या विविध रानभाज्या..पानफुटी,गवती चहा,तुळस,ओवा ,वेखंड, अडुळसा,सुरपीन इ.औषधी वनस्पती, तसेच नाचणीची भाकर,अळुवड्या, पातोळ्या, शेवग्याची भाजी असे विविध पौष्टिक पदार्थ पाहून सर्वचजण अचंबित झाले.
सर्वच मान्यवरांनी आपल्या मनोगतातून रानभाज्यांचे आहारातील महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.शाळेतील छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या श्रीम.सायली लांबर ,पालक वर्ग यांचे सर्वांनीच तोंड भरून कौतुक केले.
यावेळी उपस्थित सर्वांनीच महोत्सवात मांडलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.
यावेळी शिक्षणतज्ज्ञ श्री दिलीप भालेकर यांचा वाढदिवस फुलझाड देऊन करण्यात आला.या कार्यक्रमाच्या औचित्याने श्रीमती सरिता मुननकर यांनी विद्यार्थ्यांना खाऊ साठी एक हजार रुपये दिले.
हां सुंदर आणि अनोखा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी शिक्षिका श्रीमती सायली लांबर , श्री केशव जाधव, श्री गुरुप्रसाद तेजम ,श्रीम.खोचरे ,श्रीम.पूनम तुयेकर , श्रीम.जान्हवी वारीक, श्रीम.प्रांजल जाधव,पूनम गौंड,मेघा शर्मा आणि विद्यार्थी वर्ग यांनी विशेष प्रयत्न केले.शेवटी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सन्माननीय श्रीमती लांबर मॅडम यांनी सर्वांचे आभार मानून रान महोत्सवाची सांगता केली.