Sawantwadi News : मिलाग्रीस हायस्कूलच्या आस्था लोंढेचे कॅरम स्पर्धेत यश!

शेअर करा

जिल्हास्तरीय स्पर्धेत पटकावला सहावा क्रमांक; विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड!

​सावंतवाडी,दि.०३ नोव्हेंबर

​येथील मिलाग्रीस हायस्कूलची इयत्ता दहावीत शिकणारी विद्यार्थिनी
कुमारी आस्था अभिमन्यू लोंढे हिने नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सहावा क्रमांक पटकावला आहे. या शानदार यशामुळे आस्थाची आता आगामी विभागीय स्तरावरील कॅरम स्पर्धेसाठी अधिकृत निवड झाली आहे.
​आस्थाच्या या क्रीडा क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल मिलाग्रीस प्रशालेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालढाणा यांनी आस्थाला सन्मानित करून तिचे विशेष कौतुक केले.
​आस्थाने मिळवलेल्या या यशाबद्दल शाळेतील सर्व शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमी नागरिकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विभागीय स्तरावरही आपल्या खेळाची छाप पाडण्यासाठी आस्था कसून सराव करत असून, सर्व स्तरातून तिला पुढील वाटचालीसाठी भरघोस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

शेअर करा