सिंधुदुर्ग : भाजपा किसान मोर्चाच्यावतीने शेती निष्ठ पुरस्कार प्राप्त महेश संसारे यांचा सत्कार

शेअर करा

मोदी सरकार च्या १२ वर्षांच्या वर्षपुर्ती निमित्त कार्यक्रम ; प्राकृतिक शेती संमेलन

सिंधुदुर्ग,दि.२४ जून
मोदी सरकार च्या १२ वर्षांच्या वर्षपुर्ती निमित्त भाजपा किसान मोर्चाची जिल्हा बैठक वसंत स्मृती , जिल्हा कार्यालय ओरस येथे आयोजित करण्यात आली होती . यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तपपूर्तीच्या निमित्ताने किसान मोर्चाने शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्यासाठी शेतकऱ्यांचे मेळाव्यांचे नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन केले.

भाजपा किसान मोर्चाच्या वतीने प्राकृतिक शेती संमेलन प्राकृतिक (नैसर्गिक) शेती ही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीसह पर्यावरण संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या शेतीपद्धतीचा अधिकाधिक प्रसार व्हावा व शेतकरी बांधवांना त्याचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी जिल्ह्यातील प्राकृतिक शेती संमेलनात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. असे आवाहन किसान मोर्चा जिल्हा संयोजक उमेश सावंत यांनी केले .


देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या कृषी विकासाच्या “समृद्ध शेतकरी – विकसित भारत” या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी चला, प्राकृतिक शेतीचा संदेश घराघरांत पोहोचविण्या साठी दिनांक २५ जुन रोजी वैभववाडी येधे तसेच मंगळवार दिनांक ३० जुन रोजी सकाळी १० – ३० ते १२- ३० वाजता प्राकृतिक शेती संमेलन वेंगुर्ले येथे प्रादेशिक फळ संशोधन केंद्र कॅम्प वेंगुर्ले येथे आयोजित करण्यात आले आहे .


यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळृ देसाई , किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस गुरुनाथ पाटील , कुडाळ अध्यक्ष वैभव शेणई उपस्थित होते .

शेअर करा