सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी; वैभववाडीत सर्वाधिक 56 मिमी पाऊस

शेअर करा

सिंधुदुर्ग,दि.२५ जून

जिल्ह्यात मान्सूनने चांगलाच जोर धरला असून गुरुवारी (25 जून) विविध तालुक्यांत समाधानकारक पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आज सरासरी 37.75 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

आजच्या पावसाच्या आकडेवारीनुसार वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 56 मिमी पाऊस झाला. त्याखालोखाल देवगडमध्ये 46 मिमी, कुडाळ आणि दोडामार्गमध्ये प्रत्येकी 44 मिमी पावसाची नोंद झाली. मालवण आणि सावंतवाडी येथे प्रत्येकी 30 मिमी, तर वेंगुर्ला आणि कणकवली येथे प्रत्येकी 26 मिमी पाऊस झाला.

सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले, ओढे आणि धबधबे प्रवाहित होऊ लागले असून अनेक ठिकाणी शेतीच्या कामांनाही वेग आला आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

हवामान विभागाने पुढील काही दिवस जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा