दोडामार्ग–विजघर रस्त्याच्या निकृष्ट कामाचा फटका; पावसात चिखल, खड्डे आणि धोकादायक परिस्थिती

शेअर करा

साटेली-भेडशी राऊळ महाराज मंदिर उसप तिठ्यावर चिखलाचे साम्राज्य; आंबेली येथे मोरीचा भराव खचला, ठेकेदार व प्रशासनाविरोधात नागरिकांचा संताप

दोडामार्ग, दि. २५ जून

दोडामार्ग ते विजघर रस्ता करणाऱ्या बेजबाबदार तसेच निष्काळजीपणा मुळे पावसाळ्यात वाट लागली आहे. आवश्यक ठिकाणी कोणत्याही प्रकारची आवश्यक उपाययोजना तसेच मुख्य रस्ता लागून असलेले रस्ते न जोडता माती भराव टाकला यामुळे साटेली भेडशी राऊळ महाराज मंदीर उसप तिठा धोकादायक परिस्थिती निर्माण होऊन चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तर आंबेली येथे मोरी भराव खचून खड्डे पडले आहेत. पण संबंधित ठेकेदार याने दूर्लक्ष केले आहे. ठेकेदार प्रशासन यांच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासकीय अधिकारी संबंधित ठेकेदार याला पाठीशी घालत आहेत. असा आरोप केला जात आहे.

दोडामार्ग ते विजघर रस्ता पावसाळ्यात मृत्यूचा सापळा बनला आहे. संबंधित ठेकेदार यांनी पावसाळ्यात वाहन धारकांना, नागरीकांना सुरक्षित प्रवास करता आला पाहिजे यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नाही साईड पट्टी काही ठिकाणी पूर्ण नाही तसेच मुख्य रस्ता लागून गावात जे रस्ते जातात ते रस्ते सिमेंट काँक्रिट झिरो पाॅईंट करून न जोडता माती भराव टाकून चिखल करून ठेवला आहे. यामुळे राऊळ महाराज स्मारक मंदिरात जाणे तसेच उसप पिकुळा रस्ता वाहन घालणे कठीण होऊन बसले आहे.

शेअर करा