तळेरे : कुमारी स्नेहल संतोष तवटे हिच्या सीए परीक्षेतील यशाबद्दल ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनतर्फे अभिनंदन

शेअर करा

तळेरे,दि.२५ जून

कुमारी स्नेहल संतोष तवटे हिने सीए (चार्टर्ड अकाउंटंट) परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या वतीने तिचे तसेच तिच्या आई-वडिलांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले व तिच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

स्नेहलने अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि समर्पणाच्या बळावर हे यश मिळवले असून, तिची ही कामगिरी अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. तिच्या यशामागे आई-वडिलांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि भक्कम पाठबळ महत्त्वाचे ठरले असून, त्यांच्या योगदानालाही यावेळी विशेष गौरविण्यात आले.

स्नेहलने भविष्यातही अशीच उत्तरोत्तर प्रगती करत आपल्या ज्ञान, कर्तृत्व आणि प्रामाणिक परिश्रमांच्या जोरावर समाजाच्या विकासात मोलाचे योगदान द्यावे, अशी सदिच्छा ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

यावेळी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, कणकवली तालुका अध्यक्ष तथा स्पेक्टोमार्ट ऑप्टिकल्सचे संचालक मंगेश चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हा खजिनदार हनीफभाई पीरखान, कणकवली तालुका सदस्य तथा कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाचे कणकवली तालुकाध्यक्ष मंगेश सावंत, डॉ. हर्षदकुमार पटेल, भरत तळवडेकर आणि अंकित इकाळे उपस्थित होते.

शेअर करा