तळेरे : केंद्रशाळा कासार्डे नं. १ येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

शेअर करा

तळेरे,दि.२८ जून
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हाह परिषद केंद्रशाळा कासार्डे नं. १ येथे कृषी महाविद्यालय सांगुळवाडी, ग्रामपंचायत कासार्डे व केंद्रशाळा कासार्डे यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक योगासनांनी करण्यात आली. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर केले.
याप्रसंगी माजी उपसभापती सन्मा. प्रकाश पारकर यांनी योगाचे महत्त्व विषद करत नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास सरपंच सन्मा. निशा नकाशे मॅडम, उपसरपंच गणेश पाताडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद शेटये, केंद्रप्रमुख नितीन पाटील , मुख्याध्यापक आनंद तांबे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच शाळेतील शिक्षक दीपक पवार, मारुती मेस्त्री, मनोहर मराठे, कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी, केंद्रशाळा कासार्डे येथील विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
योग दिनाच्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत केंद्रप्रमुख सन्मा.नितीन पाटील सर माहिती देऊन समाजामध्ये जागरूकता निर्माण करा. असे सांगितले तसेच नियमित योगाभ्यास करण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत, कृषी महाविद्यालय व शाळेच्या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

शेअर करा