तळेरे : सरस्वती काशीराम नर यांचे निधन

शेअर करा

तळेरे,,दि.०२ जुलै
वारगाव येथील सरस्वती काशीराम नर यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी मुंबई येथे निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. वारगाव विकास मंडळ मुंबईचे कार्याध्यक्ष तथा दानशूर व्यक्तिमत्व सुधाकर नर यांच्या त्या मातोश्री होत्या.

अत्यंत आपुलकी आणि कुटुंबवत्सल असलेल्या सरस्वती नर यांच्या निधनाने वारगाव आणि साळीस्ते येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. कुटुंबात काबाडकष्ट करून आपल्या मुलांने चांगले शिक्षण घ्यावे अशी त्यांची दुरदृष्टी होती. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातू, नातसून, पणतू, नात असा परिवार आहे.

शेअर करा