वेंगुर्ला : पथविक्रेता तक्रार निवारण, विवाद निर्णय समितीच्या सदस्य नियुक्तीसाठी मागणी अर्ज

शेअर करा

वेंगुर्ला,दि.२५ जून
पथविक्रेता (उपजीविकेचे संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम २०१४ तसेच महाराष्ट्र पथविक्रेता नियम २०१६ अन्वये वेंगुर्ला न.प.करीता पथविक्रेता तक्रार निवारण व विवाद निर्णय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीवर सदस्य म्हणून नियुक्तीसाठी पात्र व इच्छुक व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
समितीमध्ये अध्यक्ष म्हणून दिवाणी न्यायधीश किंवा न्यायदंडाधिकारी दर्जाच्या व्यक्ती तसेच दोन सदस्यांचा समावेश असेल. सदस्यपदासाठी अर्जदाराचे वय ३५ ते ६५ वर्षांदरम्यान असणे, मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी धारण केलेली असणे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कामाचा अनुभव असणे तसेच सामाजिक कार्य, नागरी प्रशासन किंवा पथविक्रेत्यांशी संबंधित विषयांबाबत किमान दहा वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. पात्र व इच्छुक व्यक्तींनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज २ जुलैपूर्वी मुख्याधिकारी, वेंगुर्ला न.प.यांच्याकडे सादर करावेत. तसेच अधिक माहितीसाठी न.प.कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन वेंगुर्ला न.प.तर्फे करण्यात आले आहे.

शेअर करा