वेंगुर्ला: माजी उपमुख्यमंत्री अजिदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहाचे आयोज

शेअर करा

​​वेंगुर्ला,दि.१९ जुलै

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त २२ ते २८ जुलै या कालावधीत जनसेवा सप्ताहाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी नुकतीच महिला काथ्या औद्योगिक सहकारी संस्थेमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले
दि.२२ जुलै रोजी सकाळी १०.३० वा. महिला काथ्या औद्योगिक सहकारी संस्था येथे महिला बचत गटा सक्षमीकरण, स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यक्रम, दि.२३ रोजी आरोग्य तपासणी, दि.२४ रोजी वृक्षारोपण, दि.२५ रोजी आषाढी एकादशीनिमित्त वारकरी सेवा उपक्रम राबविण्यात येणार आहे. दि.२८ रोजी प्रगतशील शेतकरी महिला व पुरूष यांना अजितदादा कृषी सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव एम.के.गावडे, महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, वेंगुर्ला तालुका महिला अध्यक्षा ऋतुजा शेटकर, शहर अध्यक्षा सुप्रिया परब, तालुका सरचिटणीस संतोष राऊळ, शहर अध्यक्ष सुरज परब, युवती अध्यक्षा निधी शिरोडकर, प्रविणा खानोलकर, तेजस्वी गावडे, मिनाक्षी आरोंदेकर, सौ.तोडकर, सुप्रिया जाधव आदी उपस्थित होते.

शेअर करा