वेंगुर्ला,दि.१५ सप्टेंबर
क्रिडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तरीय १४ वर्षाआतील जलतरण व डायव्हिंग स्पर्धेत प्रिं.एम.आर. देसाई इंग्लिश मिडियम स्कूलची लक्षिता जयेंद्र चौधरी (इ.७ वी ) हिने यश संपादन केले.
क्रिडा संकुल ओरेास येथे घेण्यात आलेल्या जलतरण स्पर्धेत १०० मी. फ्रि स्टाईल मध्ये द्वितीय क्रमांक तसेज २०० मी. व ५० मी. फ्रि स्टाईल या प्रकारात तृतिय क्रमांक प्राप्त करत यश संपादन केले. तिची शालेय विभागीय स्तरावर होणाऱ्या जलतरण स्पर्धसाठी निवड झाली.
तिच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर चे सचिव प्रा. जयकुमार देसाई, पेट्रॅान कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, चेअरमन डॉ. मंजिरी देसाई-मोरे, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, प्रशालेच्या मुख्याध्यापिका मिताली होडावडेकर व शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.