वेंगुर्ला : अमली पदार्थ व सायबर गुन्हेगारीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

शेअर करा


वेंगुर्ला,दि.२८ जून

शालेय वय हे अतिशय संवेदनशिल असते. त्यामुळे याच वयात विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम समजाऊन सांगितले तर ते त्याच्या आहारी जाणार नाहीत व व्यसनांपासून दूर राहतील. त्यामूळे ते पुढे भावी जीवनात देशाचा व आपल्या आईवडीलांचा नावलौकिक वाढवतील, असे प्रतिपादन वेंगुर्ला पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शेखर दाभोलकर यांनी केले.
‘सुरक्षित सिंधुदुर्ग ‘अभियाना अंतर्गत वेंगुर्ला पोलीस ठाणे व MKCL निकॉम कॉम्पुटर यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली अणसूर-पाल हायस्कूल येथे नुकताच अमली पदार्थ व सायबर सुरक्षा मार्गदर्शन वर्ग घेण्यात आला.
याचवेळी मोबाइल व इंटरनेटचा अतिवापर व त्यांच्या वापराबाबत जागरुकता नसल्यामुळे होणाऱ्या सायबर गुन्ह्याबाबत निकॉम कॉम्प्युटरचे संचालक प्रशांत निकम यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक राजेश घाटवळ यांनी केले. सूत्रसंचालन विजय ठाकर यांनी तर आभारसंचिता परब यांनी मानले. यावेळी शाळेच्या माजी शिक्षिका अक्षता पेडणेकर, सहाय्यक शिक्षिका प्रीती परब व होमगार्ड शेटकर उपस्थित होते.

शेअर करा