वेंगुर्ला,दि. १८ ऑगस्ट
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षामध्ये मठ केंद्रशाळा नं.१ मधील इयत्ता चौथीमधील विद्यार्थीनी कु.स्वराध्या निलेश पेडणेकर हिन ३०० पैकी २३४ गुण मिळवित जिल्हा गुणवत्ता यादीत ५८वा तर तालुका गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक पटकाविला. तिला तिचे आजोबा बाबुराव कांबळी, मुख्याध्यापक भोई यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.