आचरा – पिरावाडी येथे हनुमान चालीसा सामूहिक वाचन कार्यक्रम संपन्न

शेअर करा

आचरा,दि.२९ ऑगस्ट (अर्जुन बापर्डेकर)
श्री तरुण संघ दक्षिणवाडा आणि हनुमान मंदिर न्यास दक्षिणवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री हनुमान मंदिर आचरा – पिरावाडी येथे आज हनुमान चालीसा सामूहिक वाचन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी आतापर्यंत तीन श्रावणी शनिवार धरून 2835 एवढे दिवे श्री हनुमान चरणी प्रज्वलीत करण्यात आले यावेळी दिपप्रज्वलन, श्री राम रक्षा पठण ,श्री हनुमान चालीसा सामूहिक वाचन, हनुमान स्तोत्र व मंत्र पठण श्रींची महाआरती व पिरावाडी येथे श्रींची पालखी परिक्रमा असे कार्यक्रम संपन्न झाले यावेळी बहुसंख्येने हनुमान भक्त उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन श्री तरुणसंग व श्री हनुमान मंदिर न्यास दक्षिणवाडा यांनी केले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व कार्यकारणी सदस्य तसेच सभासद यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा