आचरा,दि.३१ ऑगस्ट (अर्जुन बापर्डेकर)
सण-उत्सव निर्धोकपणे साजरे होण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांप्रती आदर व्यक्त व्हावा, या हेतूने महिला दक्षता समितीतर्फे आचरा पोलीस ठाण्यात रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
यावेळी महिला दक्षता समितीच्या सदस्यांनी आचरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय कातीवले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना राख्या बांधून औक्षण केले. तसेच त्यांचा सत्कारही करण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक संजय कातीवले, उपनिरीक्षक मिनाक्षी देसाई, तुकाराम पडवळ, मनोज पुजारे यांसह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तर महिला दक्षता समितीच्या डॉ. जुवेरीया मुजावर, अनुष्का गावकर, स्वरा पालकर, तन्वी जोशी, नंदा पांडे, प्रतीक्षा पालकर, पूनम गोलतकर, मिताली कोरगावकर, वैशाली हिर्लेकर, नंदिनी पांगे, प्रणाली आचरेकर, हेमांगी मोरजकर आदी उपस्थित होत्या.