वैभवशाली पतसंस्थेच्या वार्षिक सभेत श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार करंबेळकर यांना प्रदान
आचरा,दि.२८ ऑगस्ट (अर्जुन बापर्डेकर)
समाज सेवा ही निरपेक्ष भावनेने असावी.नात्यांच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण सेवा करतो ती खरी समाज सेवा असते असे मत थोर समाजसेविका आणि कै श्रीकांत सांबारी पुरस्कार प्राप्त वंदना करंबेळकर यांनी आचरा येथे व्यक्त केले.
निरामय संस्थेच्या माध्यमातून गेली दोन दशकांहून अधिक काळ समाजसेवा, समाजप्रबोधनाचे कार्य करणाऱ्या श्रीमती वंदना करंबेळकर यांना कै श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार प्राप्त झाला होता. याचे वितरण
वैभवशाली श्री देव रामेश्वर ग्रामीण बि.सह.पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेचे चेअरमन मंदार सांबारी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्या सोबत व्यासपीठावर चेअरमन मंदार सांबारी,व्हा.चेअरमन सुरेश हडकर, संचालक वामन आचरेकर, प्रकाश मेस्त्री, पांडुरंग वायंगणकर
लक्ष्मण आचरेकर
दिलीप कावले, डॉ प्रमोद कोळंबकर,श्रीकांत बागवे,सौ. रागिनी ढेकणे,सौ. हेमांगी खोत,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सरोज परब,मुख्यकार्यकारी अधिकारी दौलत राणे, अभिजित जोशी,यांसह अन्य आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना श्रीमती करंबेळकर यांनी निरामय संस्थेच्या वाटचालीबाबत माहिती दिली.या सभेचे औचित्य साधून
मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.