बांदा : ‘मागेल त्याला हळद’ उपक्रमातून शेतकऱ्यांना नवा शेती पर्याय

शेअर करा

जि. प. सदस्या अपर्णा सातोसकर यांच्याकडून मोफत हळद बियाणे वाटप; पावसाच्या खंडामुळे उत्पादनावर परिणाम, मात्र शेतकऱ्यांचा उत्साह कायम


बांदा,दि. २० ऑगस्ट


जिल्हा परिषद सदस्य अपर्णा सातोसकर यांनी आपल्या मतदारसंघात ‘मागेल त्याला हळद’ या संकल्पनेतून शेतकऱ्यांना हळदीच्या बियाण्याचे मोफत वाटप करून पारंपरिक शेतीला नवा पर्याय उपलब्ध करून दिला. त्यांच्या या उपक्रमाचा लाभ मतदारसंघातील बहुतांश शेतकऱ्यांनी घेत हळद लागवडीचा प्रयोग केला. सुरुवातीला हळद लागवडीनंतर पावसाने दडी मारल्याने उत्पादनावर काहीसा परिणाम झाला असला तरी शेतकऱ्यांचा उत्साह कायम आहे.


पाडलोस येथील शेतकरी सुनील गावडे यांनी सांगितले की, अपर्णा सातोसकर यांनी हळद लागवडीसाठी दिलेली प्रेरणा निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. यंदाच्या अनुभवातून पुढील वर्षी अधिक नियोजनबद्ध पद्धतीने हळद लागवड करून चांगले उत्पन्न घेण्याची प्रेरणा मिळाली आहे. शेतकऱ्यांना नवे पीक घेण्यासाठी प्रोत्साहन देणारे असे उपक्रम ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे ठरतात, असे गावडे म्हणाले.

जिल्हा परिषद सदस्य अपर्णा सातोसकर यांच्यासह भाजपचे ओमकार प्रभू आजगावकर व मळेवाड येथील प्रगतशील शेतकरी अमित नाईक यांनी पाडलोस गावातील शेतकऱ्यांना प्रमुख मार्गदर्शन केले. भविष्यात आम्ही यावर्षीपेक्षा अधिक हळदीचे उत्पन्न घेऊ असे शेतकऱ्यांनी सांगितले.

शेअर करा