आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना व हनुमान युवक क्रीडा मंडळाचा संयुक्त उपक्रम; उपस्थित राहण्याचे आवाहन
देवगड,दि.२० जुलै
देवगडचे ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले कै. दयानंदजी मांगले यांच्या नुकत्याच झालेल्या दुःखद निधनानंतर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना, देवगड तालुका आणि हनुमान युवक क्रीडा मंडळ, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही शोकसभा मंगळवार, दि. २१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता शिक्षक भवन, देवगड (रामेश्वर मेडिकल समोर) येथे आयोजित करण्यात आली आहे.
कै. दयानंद मांगले यांनी पत्रकारितेबरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले होते. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आयोजित या शोकसभेला नागरिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी तसेच सर्व स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना आदरांजली वाहावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.