अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त मंदिरात भेट; देवस्थानच्या वतीने शाल-श्रीफळ देऊन सत्कार
देवगड,दि.३० ऑगस्ट
देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील श्री विठ्ठल-रुक्माई मंदिरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांनी मंदिराला भेट देत श्री विठ्ठल-रुक्माईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमाची माहिती घेत भाविकांशी संवाद साधला.
यावेळी देवस्थानच्या वतीने तसेच पंढरपूर वारी समितीच्या वतीने देखील पालकमंत्री नितेश राणे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. श्री विठ्ठल-रुक्माई मंदिरात २९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, हरिनाम, आरती तसेच अन्य धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या भेटीवेळी देवस्थानचे अध्यक्ष सूर्यकांत जोशी, मानकरी देविदास कुबल, शिवाजी कांदळगावकर, ज्ञानेश्वर खवळे, अमोल जोशी, संदीप कांदळगावकर, बापू जुवाटकर, विलास नावगे, नामदेव तळवडकर, देविदास परब, मिलिंद कुबल, धर्मराज जोशी, उषकला केळुसकर, वैशाली तोडणक, रवींद्र कोयंडे आदी उपस्थित होते.
तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते बाळ खडपे, अर्बन बँकेचे अध्यक्ष प्रकाश राणे, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, नगरसेवक शरद ठुकराल यांच्यासह ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री नितेश राणे यांच्या भेटीमुळे देवस्थानच्या पदाधिकारी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.